ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर हल्ला करणारे आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र..
Letter to the Chief Minister regarding action to be taken against the accused who attacked Kalpita Pingale, Assistant Commissioner, Thane Municipal Corporation.
ठाणे - ठाण्यातील कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना झालेल्या हल्ल्यात ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांची भेट घेतली.
त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
त्यांनी पत्रात असे नमूद केले आहे की राज्यात फेरीवाला फेरीवाला धोरण अंतिम झालेला नाही. त्याचा गैरफायदा घेऊन काही समाजविघातक व्यक्ती अनाधिकृत पणे पदपथ अडवून बेकायदेशीर व्यवसायाला प्रोत्साहन आणि संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे यात भ्रष्ट अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे. भ्रष्ट अधिकारी अशा व्यवसायांना प्रोत्साहन देत असून प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर जीव घेणे हल्ले करण्यापर्यंत या भ्रष्ट साखळी ची हिम्मत वाढली आहे . अवैध व्यवसायांना संरक्षण देणारी गुन्हेगार व भ्रष्ट अधिकारी अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारी वाढली आहे. ठाणे येथे झालेला प्रकार याच वर्गातील आहे. त्यामुळे केवळ हल्ला करणाऱ्या विरोधात कारवाई न करता अशा संघटित कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना उजेडात आणण्यासाठी गुन्हा दाखल करून मोक्कांतर्गत कारवाई करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा