अबब...पोलिसांनी चोरी आणि गुन्ह्यातील 1 कोटीहून अधिकचा सोने, चांदी मुद्देमाल नागरिकांना परत दिला
Police returned more than Rs 1 crore worth of gold and silver to the citizens from theft and crime
पंढरपूर - एखाद्या ठिकाणी चोरी झाली किंवा तेथील माल लंपास झाला तर तो परत मिळणे याची काही शाश्वती नसते परंतु आश्चर्यकारक हे एका पोलीस स्टेशन मध्ये घडलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशन ,पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन आणि करकंब पोलीस स्टेशन येथे चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
या भागात झालेल्या चोरी मध्ये सोने-चांदी ,रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल चोरीला गेला होता. चोरीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर त्याचा तपास करून मुद्देमाल किंवा रोख रक्कम परत मिळणे याबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झालेला असतो. आणि याबाबत पॉझिटिव्ह रिप्लाय परत मिळेल याची गॅरंटी नसते.
अनेक जणांची दुचाकी, चारचाकी वाहने ही चोरीला गेली होती. सोने-चांदी ,मोबाईल, दुचाकी-चारचाकी आणि इतर मुद्देमाल यांची तक्रार दिलेल्या जवळपास 37 फिर्यादी यांना कोर्टाच्या आदेशाने एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला आहे.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन आणि करकंब पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये घडलेल्या गुणांमध्ये जो काही जप्त माल होता तो जप्त माल अर्जदार आणि फिर्यादी दाखल केलेल्या नागरिकांना माननीय पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक झेंडे साहेब ,पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जे तक्रारदार फिर्यादी आहेत त्यांना सन्मानपूर्वक परत केलेला आहे.
यामध्ये जवळपास 37 अर्जदार फिर्यादी आणि टोटल एकूण मुद्देमाल आहे तो 1 कोटी 26 लाख मुद्देमाल परत केला आहे असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे.गेल्या दोन महिन्यापूर्वी चोरीला गेलेले 30 तोळे सोने चांदी पोलिसांनी चोरांना पकडून जप्त केले होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा