डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते की 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल परंतु डॉ. कलाम यांचे स्वप्न देखील खड्ड्यात चाललंय.. शाळकरी मुलीचे भाजप आमदाराला पत्र
Dr. APJ Abdul Kalam had a dream that India would be a superpower by 2020 but Dr. Kalam's dream is also running in the pit .. Letter of a school girl to a BJP MLA
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावच्या इयत्ता 9 वी तील शगुप्ता राजू इनामदार या शाळकरी मुलीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजप आमदार समाधान अवताडे यांना रस्ता संदर्भात पत्र लिहिले आहे.
त्या पत्रात तिने असे म्हटले आहे की, "आदरणीय आ. समाधान दादा अवताडे मी शगुफ्ता राजु इनामदार , इयत्ता - नववी, श्री विठ्ठल प्रशालेची विद्यार्थिनी आपल्याला जयराम वस्ती ते बंधारे पर्यंत रस्ता व्यवस्थित करणेबाबत पत्र लिहीत आहे.
दादा डॉक्टर ए .पी .जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते की 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल परंतु 2021 सालच्या कौठाळी रोडवरचे खड्डे पाहिल्यानंतर असे वाटतय की वाटसरू आणि डॉक्टर कलाम यांचे स्वप्न देखील खड्ड्यात चाललंय. अहो दादा सायकलवरून शाळेला जाताना मी आणि माझ्या मैत्रीनी कित्येकदा त्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडलोय.एकदोन वेळा तर मला मोठी दुखापतही झाली आहे. कित्येक वयोवृद्ध सोडाच पण प्रौढ लोकांना देखील हा रस्ता प्रवासात अडथळा आणतो. एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला योग्य वेळी उपचार होऊ शकत नाही. नेमकं हेच समजत नाही की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे.
माझ्या आजोबांच्या काळापासून हा रस्ता अंगावरती खड्डे घेऊन बसलेला आहे. सलग तीन पिढ्या हा रस्ता आपल्या अंगावरती खड्डे आणि कौठाळीकरांचा दुःख पेलून आहे. कित्येक वर्षापासून हा रस्ता एका अवलियाची वाट पाहतो जो त्याला पिडामुक्त करेल आणि दादा हा दुसरा तिसरा कोणी नसून आपण आहात... किती आमदार आले परंतु हा रस्ता आपल्या शिवाय कोणीच करू शकणार नाही याची मला ग्यारंटी आहे. मला विश्वास आहे की समाधान दादा कौठाळीकरांचे समाधान नक्कीच करणार.
समस्त कौठाळीकरांच फक्त आणि फक्त आपणच आशास्थान आहात तरी आपण हा रस्ता दुरुस्त करावा ही विनंती..! "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा