सिंधुदुर्ग चिपी विमानतळ होऊ नये यासाठी त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला - नितेश राणे - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ होऊ नये यासाठी त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला - नितेश राणे

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ होऊ नये यासाठी त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला - नितेश राणे 

At that time, the ShivSena initially opposed the construction of Sindhudurg Chipi Airport - Nitesh Rane

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी असे म्हटले आहे की, " सिंधुदुर्गाचा पर्यटनातून विकास व्हावा यासाठी सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेबांचे स्वप्न होते. राणे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी २००९ साली विमानतळ मंजूर होऊन राणे साहेब २०१४ पर्यंत पालकमंत्री असताना या कार्यकाळापर्यंत विमानतळाचे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. मध्यंतरीच्या काळात धीम्या गतीने सुरू असलेले काम राणे साहेबांच्या भाजप प्रवेशानंतर अधिक गतीने सुरू झाले. विमानतळ हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने केंद्राच्या सर्व परवानग्या नारायण राणे यांनी मिळवून दिल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विमानतळ ९ ऑक्टोबर पासून जनेतसाठी कार्यान्वित होत आहे.


चिपी विमानतळ होऊ नये यासाठी त्यावेळी शिवसेनेने सुरुवातीला प्रचंड विरोध केला. लोकांची दिशाभूल करून अडथळे निर्माण केले. मात्र आज विमानतळ पूर्ण होताच त्यावेळी विमानतळाला विरोध करणारे शिवसेनेचे लोक आज श्रेय लाटायला पुढे पुढे करत आहेत. २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याशी काडीचा संबंध नसलेले विनायक राऊत फुकटच्या श्रेयासाठी बडबड करताना दिसतात.


९ ऑक्टोबर २०२१ ला चिपीच्या विमानतळावरुन टेकऑफ घेणार आहे. याचे श्रेय पूर्णतः आदरणीय नारायणराव राणे साहेबांचेच आहे हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads