पंढरपूर येथील स्वेरीत ‘इनोव्हेशन ॲम्बेसिडर ओरीएंटेशन सिरीज’ हा ऑनलाईन उपक्रम संपन्न - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

पंढरपूर येथील स्वेरीत ‘इनोव्हेशन ॲम्बेसिडर ओरीएंटेशन सिरीज’ हा ऑनलाईन उपक्रम संपन्न

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि 'इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल' सेल (आय. आय.सी.)  तर्फे ‘स्वेरीज् आय.आय.सी. इनोव्हेशन ॲम्बेसिडर ओरीएंटेशन सिरीज’ या दोन दिवसीय ऑनलाईन उपक्रम संपन्न.

The online initiative 'Innovation Ambassador Orientation Series' was held at Sveri in Pandharpur.

पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि 'इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल' सेल (आय. आय.सी.)  तर्फे ‘स्वेरीज् आय.आय.सी. इनोव्हेशन ॲम्बेसिडर ओरीएंटेशन सिरीज’ या दोन दिवसीय ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, डॉ. विद्याराणी क्षीरसागर व  डॉ. सोमनाथ ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ व २८ ऑगस्ट या दोन दिवशी या उपक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाविद्यालये  बंद आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. उदघाटन प्रसंगी बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार हे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलच्या कार्याबद्दल माहिती सांगताना म्हणाले की, ‘एखाद्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्याप्रमाणे एखाद्या लहान संकल्पनेचे रूपांतर मोठ-मोठ्या प्रकल्पांमध्ये करण्यासाठी इनोव्हेशन ॲम्बेसिडरचे कार्य खूपच उपयुक्त असते.’ त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.नितीन मिसाळ यांनी पेटंटचे महत्त्व सांगताना म्हणाले कि, 'आपल्या कल्पनांचे व प्रकल्पाच्या माध्यमातून झालेल्या उत्पादनाचे पेटंट मध्ये रूपांतर व्हावे.’ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी यांनी ‘इनोवेशन अँड इंटरप्रेनर इनीशियेटीवज प्रोग्राम’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वेरीतील आय.आय.सी.च्या अध्यक्षा डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी: रिसर्च इनोव्हेशन अँड इंटरप्रेनरशिप फॉर एच.ई.आय. याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. यानंतर संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे डॉ. प्रवीण ढवळे यांनी प्रकल्पासंबंधी महत्वाचे विचार मांडले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अविनाश पारखे होते तर प्रा. विनायक साळवे, प्रा. दिग्विजय रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले. डॉ.महेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. विद्युलता पाटील यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads