पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Section 144 has been imposed in Pune during Ganesh festival.


पुणे - पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांनी गर्दी करू नये आणि  बाजारपेठेत गर्दी वाढू नये म्हणून पुण्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

गणरायाच आगमन होणार आहे म्हणून पुण्यातील बाजार पेठांमध्ये नागरिकांनी खूप गर्दी केली आहे.

गणेशोत्सवात लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकर बाजारात जमलेले दिसत आहेत. 

 

त्यामुळे पुणे शहरात 10 सप्टेंबर ते 19   सप्टेंबर पर्यंत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट टळलेलं नाही.

गर्दी होऊन कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून पुणे पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads