पंढरपुरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या फोटोला चपलेने मारहाण
In Pandharpur, a photo of Opposition Leader of the Legislative Council Praveen Darekar was slapped
पंढरपूर - प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ पंढरपूर येथे राष्ट्रीवादी पक्षाकडून जोडेमारो आंदोलन केले आहे.
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
'गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,' असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
याचा निषेध म्हणून पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन जोडेमारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.
सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणे महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणे ही भाजपची परंपरा आहे आणि संस्कृती आहे हे तुम्हीच सिद्ध केले आहे.
ज्या भाजप महिला आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षातील लोकांची उणिधुनी काढण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्याना संस्काराची शिकवणी सुरू करावी.
हे बेताल वक्तव्य ज्या दरेकर साहेबांनी काढले आहे त्यांनी तमाम महिलांची माफी मागावी नाही तर राष्ट्रवादी युवती तीव्र आंदोलन करतील आणि तुमच्या तोंडाला काळ फसल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने इशारा दिला आहे
यावेळी रंजना हजारे(महिला जिल्हा कार्याध्यक्षा),श्रीया भोसले (युवती जिल्हाध्यक्षा),साधना राऊत(obc जिल्हाध्यक्षा महिला),अनिता पवार(महिला तालुका अध्यक्ष),शुभांगी जाधव(किसानसेल जिल्हाध्यक्षा),संगीता माने,सारिका गायकवाड, छाया खंडागळे,ऋतुजा चव्हाण,श्वेता देशपांडे, पूजा लवंगकर,प्राजक्ता परचंडराव,प्रीती घोरपडे, गिरीश चाकोते, सचिन आदमीले, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील जगताप,विध्यार्थी काँग्रेस सागर पडगळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा