Aarogya Vibhag Bharti 2021 Update : आरोग्य विभाग भरती 2021 चे Group C व Group D चे हॉल तिकीट उद्यापासून प्राप्त होणार
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी
www.arogyabharti2021.in या संकेतस्थळावर दिनांक ०६/०८/२०२१ ते दिनांक २२/०८/२०२१ व
गट ड संवर्गातील पदासाठी दिनांक ०९/०८/२०२१ ते दिनांक २३/०८/२०२१ या कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
यामध्ये गट क व गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा दिनांक २५/०९/२०२१ व दिनांक २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
• लेखी परिक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षा याबाबतची सखोल माहिती उमेदवारांना परीक्षेच्या एक आठवडा अगोदर
www.arogyabharti2021.in या संकेत स्थळावर मिळेल.
• परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी नियमितीपणे आरोग्य विभागाचे ऑफिशियल संकेत स्थळावर भेट द्यावी.
गट क संवर्गासाठी परिक्षेचे स्वरूप :-
१) या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे
२) गट क पदांकिरता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ओ.एम.आर. उत्तरपत्रिका पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
गट ड संवर्गासाठी परिक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे :-
1) सदर परीक्षेची उत्तरपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल
2) परीक्षेत एकूण 50 प्रश्न असतील
3) प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील त्याप्रमाणे 100 गुणांची परीक्षा असेल
4) गट ड संवर्गातील पदांकिरता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा