हसन मुश्रीफ यांच्यामुळे आंबा मातेचे दर्शन करता आलं नाही - भाजप नेते किरिट सोमैया.
Due to Hasan Mushrif, Amba Mata could not be visited - BJP leader Kirit Somaiya.
कराड - भाजप नेते किरीट सोमय्या हे काल नीलम नगर येथून 5.30 ला गणेश विसर्जन करून 7.15 वाजता CSMT सटेशन वरून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला येणार होते.
त्यावेळेस त्यांच्या घराखाली पोलिसांनी मोठी गर्दी केली आणि त्यांचा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या घरात अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले, ही ठाकरे सरकारची गुंडगिरी आहे ,पोलिसांची दमनशाही आहे असे त्यांनी आरोप केले होते.
त्यानंतर पोलिसांना न जुमानता भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापुरला हसन मुश्रीफ यांचे घोटाळे उघडे करण्यासाठी जाणार होते पण कराडमध्ये कराड पोलिसांनी त्यांना रेल्वेतून स्थानबद्ध केले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि असे सांगितले आहे की,
" हे सरकार घोटाळे करणाऱ्यांना संरक्षण देत आहे.
मला मुंबई पोलिसांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर धक्का बुक्की केली. किरीट सोमय्या ला मुंबईतून बाहेर पडता येणार नाही ,त्याला घरात कोंडून ठेवावा असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते .
बनावट आदेश दाखवणार्यावर पोलिस आणि गुंडगिरी करणाऱ्या पोलिस मुंबई अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही हायकोर्टात जाणार आहे.
मला गणेश विसर्जनासाठी कोल्हापूरला जाऊ दिले नाही.
मला अंबामातेचे दर्शन घेऊ दिले नाही.
मला रोखण्यासाठी एनसीपी चे कार्यकर्ते म्हणजे भाई लोक, गुंड लोक येणार होते.
हसन मुश्रीफ यांनी अजून माझ्या आरोपाचे उत्तर का दिले नाही ?
127 कोटी मनी लाँडरिंग च्या माध्यमातून आलेले पैशाचा तुम्ही हिशोब दिलेला नाही.
हसन मुश्रीफ विरोधात ईडीला पुराव्यासकट माहिती देणार आहे. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा