अटक केलेली नसताना अटक केली म्हणणं इथेच किरीट सोमय्यांचा खोटेपणा सिद्ध होतो - नाना पटोले
To say that he was arrested when he was not arrested proves the falsity of Kirit Somaiya here - Nana Patole
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले आरोपावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे सांगितले आहे की,
"हे आरोप फार जुना आहे नवीन नाही त्याच्या अगोदर सीबीआय चौकशी करत होती त्यानंतर ईडीकडे हे कागद गेलेले आहेत. आरोप लावणे सोपे आहे पण ते सिद्ध करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर 100 कोटीचा मानहानीचा दावा केला आहे. ईडिचा आणि सीबीआयचा वापर कसा केला जातोय हे पूर्ण देश पाहत आहे. एखाद्याने ओरडावे आणि त्याच्याकडे लक्ष द्यावे असं नसतं. कर नाही तर डर कशाला अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे महाविकास आघाडीचे काम आहे पण हे सगळे डायवर्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे ".
किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आल्याच्या घटनेवरून भाजपाने सरकारला लक्ष केले आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. अटक केलेली नसताना अटक केली म्हणणं इथेच किरीट सोमय्यांचा खोटेपणा सिद्ध होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा