उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर CET EXAM चे वेळापत्रक जाहीर केले आहे. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर CET EXAM चे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर CET EXAM चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

Higher and Technical Education Minister Uday Samant has finally announced the schedule of CET EXAM.




कोरोना असल्यामुळे अनेक दिवस सीईटीची परीक्षा झाली नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकही या परिक्षेमुळे चिंतेत होते. पण आता या CET EXAM चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

महाराष्ट्रात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये  CET EXAM होणार आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पदवी, पदव्युत्तर आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवण्यासाठी ही ENTRANCE CET EXAM घेण्यात येते. 


ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे. सीईटीला एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती, यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.


या CET EXAM चा RESULT 20 ऑक्टोबर रोजी लागणार असल्याचेही

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads