मुंबई साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करणारा दोषीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Convict who raped a woman in Sakinaka, Mumbai should be given the death penalty - Union Minister Ramdas Athavale
मुंबई - साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखावेत आणि साकिनाका येथे महिलेवर झालेला अमानुष अत्याचार बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या साकिनाका पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर पीडीत महिला जर दलित समाजाची असेल तर या प्रकरणी ऍट्रोसिटी ऍक्ट सुद्धा लावण्यात यावा. पीडित महिला कोणत्याही समाजाची असो ती महिला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. पीडित मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपयांची मदत करावी असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा