भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आणि त्यांना करारा जवाब देणार - ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आणि त्यांना करारा जवाब देणार - ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आणि त्यांना करारा जवाब देणार - ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर - महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 2700 पानाचे पुरावे आयकर विभागाला सुपूर्द केलेले आहेत. 


विविध कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती आहे.

हसन मुश्रीफ यांनी 127 कोटींचा बेकायदेशीर व्यवहार केले याची तक्रार ईडीकडे करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.



यावर ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दुपारी 2.00 वाजता कोल्हापूर येथून थेट पत्रकार परिषद घेतली. 

किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब देणार असल्याचे म्हटले आहे.

जे कारखाने होते त्याच्याबद्दल त्यांनी असे सांगितले आहे की, 

ज्या दिवशी आम्हाला परवाना मिळाला आणि आवाहन केलं, तेव्हा एकाच दिवशी १७ कोटी रुपये जमा झाले. ४ दिवस लोक नोटा मोजत होते. कारण सगळ्या शेतकऱ्यांना ५, १०, ५० रुपयांच्या देखील नोटा दिल्या होत्या. त्यानंतर हजारो लोकांनी पैसे दिले. त्याची देखील कोल्हापूरच्या आयकर विभागाकडून तपासणी झाली. हजारो शेतकऱ्यांची चौकशी झाली. बँकांची पासबुकं देखील तपासली. त्यानंतर देखील हे पैसे आले, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.


सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मला त्यांच्या पदवी वरच शंकाही आहे. 

मी आत्तापर्यंत एक रुपयाचाही गैरव्यवहार केलेला नाही. त्यांच्यावर मी 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे असे सांगितले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads