पंढरपूर येथील लोटस इंग्लिश स्कूल मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
Blood donation camp held at Lotus English School in Pandharpur
पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘रक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
या ‘रक्तदान शिबीर’ प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष बी.डी. रोंगे, विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, प्राचार्या डॉ.जयश्री भोसले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे उदघाटन डॉ.सदानंद पाटील यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पंढरपूर मधील सरजूबाई बजाज रक्तपेढीच्या पदाधिकाऱ्यांना यासाठी आमंत्रित केले होते.
रक्तदात्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल यांनी स्वागत केले. हे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी शिक्षक एस.बी. निकम, आर.बी.वाघमारे, एस.पी.खपाले, एन.बी. भोसले, व्ही. बी. फडतरे, ए.के.वाघमारे, ए.डी.घोलप, पी.एन. यल्लटीकर, एस व्ही.दिवसे, ए.पी डोंगरे, डी. एस. खपाले, जे. एन. अर्जुन. एम.जे.शिनगारे, पी.व्ही.हिंगमिरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा