अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अभिनेत्री केतकी चितळे ला अटक होण्याची शक्यता..
Actress Ketki Chitale is likely to be arrested under the Prevention of Scheduled Caste and Scheduled Tribe Atrocities Act
अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. ती सोशल मीडिया वरती काहीतरी टिप्पणी करून नेहमी लोकांच्या रोषाला सामोरे जात असते.
असेच एक विधान तिने गेल्यावर्षी फेसबुकवर केले होते.
आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारे तिने व्यक्तव्य केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिने आंबेडकरी समाजावर गरळ ओखली होती.
या फेसबुक पोस्ट मध्ये तिने असे म्हटले होते की, नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क असल्याचे म्हटले होते. डी जे काही वादग्रस्त प्रबोधन संबंधित पोस्ट केली होती त्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली आहे या व नंतर तिच्यावर एडवोकेट स्वप्नील गोविंद जगताप यांनी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (s) (u) (v) अंतर्गत 3 मार्च 2020 रोजी गुन्हा नोंदवला होता यावर ठाणे स्पेशल कोर्टात खटला सुरू केला होता.
तिच्यावर खटला चालू झाल्यानंतर तिने कोर्टात असे विधान केले होते की , आपण केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे आणि आपला कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे तिने कोर्टात सांगून न्यायालयात दाद मागितली होती.
यावर मात्र आता केतकीने केलेली फेसबुक पोस्ट चुकीची असल्याचे मत न्यायालयाने तिच्या विरोधात निकाल दर्शवला आहे.
या प्रकरणाला एक वर्ष झाल्यानंतर गेल्या नऊ तारखेला म्हणजे 9 सप्टेंबरला ठाणे स्पेशल कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच केतकी सोबत सुरज शिंदे नामक व्यक्तीवर देखील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानवाबाबत, धर्म, जात या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या अशा गोष्टींना पायबंद घातला गेला पाहिजे .पोलिसांनी यावर लक्ष देऊन त्वरित अटक केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते पोलिसांना करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा