महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी नंतर काँग्रेसने दिले किन्नर समाजाला प्रतिनिधित्व - लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी नंतर काँग्रेसने दिले किन्नर समाजाला प्रतिनिधित्व

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी नंतर काँग्रेसने दिले किन्नर समाजाला प्रतिनिधित्व

After the Vanchit Bahujan Aaghadi in Maharashtra, the Congress gave representation to the Kinnar community

मुंबई - भारतीय संविधान हे जगात प्रसिद्ध आहे. भारतीय संविधान समता, बंधुता , एकता आणि स्वातंत्र्य याची शिकवण देते. 

याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याचदा आलेला आहे. किन्नर समाजाला नेहमी वाळीत टाकले गेल जाते . या समाजाला सन्मानपूर्वक वागणूक कधीही मिळताना  आपण पाहत नाही पण आता या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम राजकीय पक्ष करत आहेत. 

महाराष्ट्रात पहिल्यांदा किन्नर समाजातील दिशा पिंकी शेख यांना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत घेऊन वंचित बहुजन आघाडीने त्यांचा सन्मान केला होता .त्यानंतर अनेक  किन्नरांनी पक्षात सदस्यत्व घेऊन काम करण्यास सुरूवात केली.  

पण आता महाराष्ट्रात काँग्रेस पक्षानेही  किन्नरांना प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे.

शिक्षण मंत्री काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती देताना असे सांगितले आहे की, 

"सल्मा उमरखान साखरकरजी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - महाराष्ट्र च्या नवनियुक्त सचिवपदी देण्यात आले आहे.  LGBTIQA+ समाजातील पहिल्या व्यक्तींपैकी हे पद धारण करणारे. एक वचनबद्ध सामाजिक कार्यकर्ते, सलमा जी किन्नर मा ट्रस्टच्या उपाध्यक्ष आहेत ज्यांचे 5000 हून अधिक ट्रान्सजेंडर सदस्य आहेत . 

सलमा जी, पार्वती परशुराम जोगी जी यांच्यासह, आणखी एक LGBTQIA+ प्रतिनिधी देखील अलीकडेच प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून सामील झाले. प्रतिनिधीत्व करताना विविधता आणि समानतेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वचनबद्ध आहे. काँग्रेस परिवारात आपले स्वागत आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads