ओबीसींचे नेते प्रामाणिकपणे लढत नाहीत. आज जर ओबीसी लढला नाही तर गुलाम झाला म्हणून समजा - दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना
OBC leaders do not fight honestly. If OBC didn't fight today, think of it as slavery - Deepak Kedar President All India Panther Sena
भूम - ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी भूम येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस त्यांनी असे सांगितले आहे की,
"ओबीसी नेत्यांनो शत्रू सत्तेतील आधी मंत्री, खासदार, आमदार पदाचे राजीनामे द्या, ओबीसी लढ्याचा खोटा आव आणू नका.
ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आणून संपूर्ण ओबीसी अस्तित्व धोक्यात आले आहे. ओबीसी उद्धवस्त करण्याचा अजेंडा केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेला आहे. ओबीसींचे नेते प्रामाणिकपणे लढत नाहीत. आज जर ओबीसी लढला नाही तर गुलाम झाला म्हणून समजा.
ओबीसींची जनगणना होणे काळाची गरज आहे. ओबीसी जनगणनेचे आंदोलन रोखण्यासाठी याठिकाणी मीडियात वेगळेच फॅब्रिक मुद्दे उभे केले जातात. सुनियोजितपणे खोटी कोंबडा झुंज खेळली जाते.
ओबीसींचे नेते यांचे दोन डिगरिवर हात आहेत. ओबीसी समूहाची ते दिशाभूल करत आहेत, खोटा आव आणत आहे. ज्या केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसींचे आरक्षण हटवले, ज्यांनी जनगणना टाळली त्यांच्याच सत्तेत बसून शेंगा झोडण्याचं काम सुरू आहे.
खरंच ओबीसींचा पुळका असेल तर ओबीसी नेत्यांनी मंत्री, खासदार, आमदार पदाचा राजीनामा मोदि - ठाकरे यांच्या चेहरयावर फेकून द्यावा. जो शत्रू त्याच्याच मांडीला मांडी लावून बसायचं आणि भंपकबाजी करायची याला अर्थ नाही.
ओबीसीसाठी महात्मा फुलेंचे खरे वारसदार आंबेडकरवादीच खरा लढणार आहेत. ऑल इंडिया पँथर सेना ओबीसी बचाव आंदोलन छेडणार आहे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा