मुस्लिम आरक्षणासाठी वंचितचे भव्य आंदोलन, नागरिकांना उपस्थित राहणाचे आवाहन - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

मुस्लिम आरक्षणासाठी वंचितचे भव्य आंदोलन, नागरिकांना उपस्थित राहणाचे आवाहन

मुस्लिम आरक्षणासाठी वंचितचे भव्य आंदोलन, नागरिकांना उपस्थित राहणाचे आवाहन

Massive agitation of Vanchit for Muslim reservation, appeal to citizens to attend


औरंगाबाद - मुस्लिम समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासले असल्याने शासनाकडे विविध अहवाल दिलेले आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 30 ऑगस्ट 2021 सकाळी 11 वाजता विविध मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. मुस्लिम समुदायाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद यांनी केले आहे. 

त्यांनी पुढे सांगितले धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत असतात अशा घटना रोखण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा एड प्रकाश आंबेडकर यांनी कठोर कायदा शासनाने बनवावा यासाठी एक मसूदा तयार केला आहे. हा मसूदा राज्य सरकारला पाठवला आहे. हा कायदा विधानमंडळात बणवावा, सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा फायदा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग झाला पाहीजे अशा विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी व भाजपा मतांचे राजकारण करुन मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला वंचित ठेवत आहे. भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेवर टिका करत त्यांनी सांगितले इंधन दरवाढ, गँस दरवाढ, महागाई, कोरोनाने जनता होरपळून गेली आहे. बेरोजगारी वाढली याची केंद्र सरकारला चिंता नाही. सध्याची देशाची परिस्थिती बघता भाजपाने माफी जन यात्रा काढायला हवी. मुस्लिम आरक्षणावर काँग्रेस, राष्ट्रवादी चे नेते काही बोलायला तयार नाही याबद्दल अल्पसंख्याक मंत्र्यावर त्यांनी टिका केली. यावेळी वंचितचे सुनील वाकेकर, पूर्वचे शहराध्यक्ष डॉ. जमील देशमुख, पश्चिमचे शहराध्यक्ष संदीप सिरसाट, सलिम पटेल, खालेद पटेल अंधारीकर, प्रो.अब्दुल समद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads