संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाचे दाखले तात्काळ देण्यात यावे - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाचे दाखले तात्काळ देण्यात यावे

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाचे दाखले तात्काळ देण्यात यावे

मा. जिल्हाधिकारी यांचे तहसिलदारांना निर्देश  

आमदार प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती मागणी  Proof of income of Rs. 21000 / - required for the beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar and Shravanbal Yojana should be issued immediately.

     

         

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी मोठ्या प्रमाणात गोर-गरीब असून त्यांची जबाबदारी सांभाळणारे त्यांच्या कुटुंबात कोणीही नसल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाकरीता अनेक अडचणी येत आहेत. याबद्दल अनेक नागरीकांनी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या कार्यालयाकडे अर्ज सादर करत असतात. सदर योजनेकरीता उत्पन्नाची मर्यादा 21000 रुपये ठरविण्यात आली आहे. परंतू सेतु कार्यालयाकडून लाभार्थ्यांना 21000 रुपयांचा उत्पन्न दाखला देण्याकरीता सर्कलमार्फत चौकशी केली जाते. त्यामध्ये त्यांचे वार्षीक उत्पन्न 21000 रुपयांपेक्षा जास्त असल्याचा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे त्यांना 21000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला देण्यात येत नसल्यामुळे सदर नागरीकांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेकरीता अपात्र ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सदर नागरीक गोर-गरीब व निराधार असून सुध्दा ते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली 21000 रुपयांच्या उत्पन्नाची दाखला मिळत नाही. यामुळे गोर-गरीब व निराधार नागरीकांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्याकरीता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाचे दाखले लवकरात लवकर मिळण्याकरीता मा जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे मागणी केली.

यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी यांनी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाची तात्काळ देण्याबाबत तहसिलदार यांना निर्देश दिले. तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना असलेली 21000 रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी याबाबत मा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads