शेतीमालाला हमी भाव मिळत नाही ,शेती तोट्यात आहे त्यामुळे शेतकऱ्याचे दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकार्यांना पत्र.
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र लिहिलेले आहे.
Letter to the District Collector seeking permission to cultivate two acres of cannabis as the farm produce is not at a guaranteed price.
त्यांनी पत्रात असे नमूद केले आहे की, " महोदय वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की माझ्या शिरपूर तालुका मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची जमीन गट नंबर 183/4 असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी ही नम्र विनंती.
मी शेतकरी असून कोणतेही केले तरी त्याला शासनाचा हमी भाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे.
शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याची देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमूद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दिनांक 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा मी दिनांक 16 नोव्हेंबर 2021 या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील ही नम्र विनंती. "
असे जिगरबाज शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा