25 ऑगस्ट पर्यंत डांबरीकरणाला सुरुवात नाही केली तर मतदारसंघात आमदार खासदाराला पाय ठेवू देणार नाही - प्रभाकर उर्फ भैय्यासाहेब देशमुख - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

25 ऑगस्ट पर्यंत डांबरीकरणाला सुरुवात नाही केली तर मतदारसंघात आमदार खासदाराला पाय ठेवू देणार नाही - प्रभाकर उर्फ भैय्यासाहेब देशमुख

25 ऑगस्ट पर्यंत डांबरीकरणाला सुरुवात नाही केली तर मतदारसंघात आमदार खासदाराला पाय ठेवू देणार नाही - प्रभाकर उर्फ भैय्यासाहेब देशमुख

पंढरपूर - महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे भव्य रस्ता रोको आंदोलन पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे ठेवण्यात आला होता.

गेल्या दहा वर्षापासून पंढरपूर ते टाकळी सिकंदर कुरुल  व तारापूर नाला ते पोहरगाव  विटे रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली असून त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मानहानी होत आहे या भागातील लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. जिल्हाधिकारी , तहसीलदार , बांधकाम विभाग यांना रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा निवेदन व तक्रार देऊन पण कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही .आपण लोकहित व सामाजिक हित लक्षात घेऊन  झोपलेले लोकप्रतिनिधींना व शासनाला जागे करण्यासाठी 4 ऑगस्ट 2019 रोजी तारापूर नाला येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना तर्फे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैयासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

आंदोलनातील प्रमुख मागण्या :

1 ) गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रखडत असलेल्या पंढरपूर ते तारापूर टाकळी शिकंदर मार्गे कुरुल रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करून अनेकांचे जीव वाचावावेत. 

2 ) गेल्या वीस वर्षापासून तारापूर नाला ते खरसोळी विटे पोहरगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे सतत अपघात होतात ते थांबवण्यासाठी त्वरित याही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी असे म्हणले आहे की, आमदार खासदार ज्या लोकांच्या जीवावर झाले त्यांना हे विसरलेले आहेत .या रस्त्यामुळे शेतकरी ,विद्यार्थी, सामान्य लोकांचे हाल भरपूर होत आहेत.

यावेळेस त्यांनी माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोहोळ मतदार संघाचे सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यावरही त्यांनी टीका केली.

आणि सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे खासदार सिद्धाराम स्वामी यांना तर ते दिसली की जनहित शेतकरी संघटनेतर्फे पाच लाखाचे बक्षीस घोषित केले आहे.

सर्व निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

या रस्ते संदर्भात त्यांनी 25 ऑगस्ट पर्यंत डांबरीकरणाला सुरुवात नाही केली तर मतदारसंघात या लोकप्रतिनिधींना पाय ठेवू देणार नाही असा दम भरला आहे.

या आंदोलनात सुस्ते ,तारापुर,  खरसोळी,विटे ,पोहरगाव, फुलचिंचोली ,मगरवाडी आणि कुरुल चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनास साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान , वादळ ग्रुप , संत रोहिदास सामाजिक संघटना आणी प्रहार संघटना तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads