दोन दलित मुलींची हत्या , पुन्हा एकदा हाथरस - लोकराजा

Breaking News

Adsense ad

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

दोन दलित मुलींची हत्या , पुन्हा एकदा हाथरस

उन्नाव,उत्तरप्रदेश - उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथून देशाला हदरवणारी घटना घडली आहे. तीन दलित मुली अतिशय बिकट अवस्थेत सापडल्या आहेत. तीनही मुली ओढणीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. यातील दोन मुलींची हत्या झाली आहे. एक मुलगी गंभीर आहे. तिला उपचारासाठी हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.  पुन्हा एकदा पोलीस "सेम टू सेम" हाथरस सारखी भूमिका घेताना दिसत आहेत. मुलींच्या परिवाराला धमकावित येणार असल्याचे  आणि तसंच विल्हेवाट लावुन प्रकरणाला वेगळं वळण देऊन प्रकरणाची सुद्धा हत्या करताना दिसत आहेत.

हाथरस प्रकरण संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्याची पुनरावृत्ती नको म्हणून मुलीला उपचारासाठी दिल्लीला हलवण्याची मागणी होत आहे. बचावलेली मुलगी एकमेव साक्षीदार असल्याने तिला सुरक्षेची सर्वात महत्त्वाची गरज आहे. तिला उपचारासाठी एअर अॅम्बुलसने दिल्लीच्या एम्स ला हलविण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडली आहे. 


जोपर्यंत उन्नाव प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत त्या मुलींचा मृतदेह स्विकारू नका अशी मी उत्तर प्रदेश मधील जनतेला विनंती करत आहे आणि यासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. जीवित मुलीला चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावे ,अशी गुजरात मधील वडगाव चे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्वीटच्या माध्यमातून मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads