मुंबई - महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल यांच्याकडे खूप दिवस झाले सोपवली आहे परंतु त्यांच्यावर अजून मान्यता दिली गेली नाही व त्या सदस्यांची यादी अजूनही रखडली गेलेली आहे.
याबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना महाविकास आघाडी सरकार कडून स्मरणपत्र पाठवण्यात आले होते परंतु त्यावर अजून पर्यंत कोणताही निर्णय देण्यात आला नाही , त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने चर्चा केली आहे .यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांन विरुद्ध आम्हा कोर्टात जाता येईल का ? यासाठी काय कायदेशीर बाबी आहेत, हे तपासून जर कोर्टात जाता येणार असेल तर आम्ही ते पाऊल उचलू असे विधान विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यपाल नियुक्त 12 जागांना मंजुरी मिळाली नसल्यामुळे अनेक समित्यांवर सदस्य पदे रिक्त आहेत. विधिमंडळ समित्यांचे कामकाज करताना संविधानिक आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे आणि विधानसभेचे अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडेच राहणार आहे असेही ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा