सन 2121 ची जनगणना बौद्धांची आत्मसन्मान व स्वाभिमानाची लढाई - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, १७ मार्च, २०२१

सन 2121 ची जनगणना बौद्धांची आत्मसन्मान व स्वाभिमानाची लढाई

सन 2021ची जनगणना म्हणजे बौद्धांची आत्मसन्मान व स्वाभिमानाची लढाई. 


जनगणना आली की संधीसाधू लोकांचा बौद्ध समाजात  गैरसमज पसरविण्याचा उद्योग  चालू होतो. हे काही नवीन नाही.

ओबीसी समाजाचा जातीनिहाय जनगणना  करण्याचा प्रयत्न  हाणून पाडला जातो. मात्र बौद्धांनी जाती लिहिण्याचा आग्रह धरला जातो.

सन 2011 च्या जनगणनेत भारतातील बौद्ध समाजाची लोकसंख्या 84 लाख 42 हजार 972 आहे.

महाराष्ट्रात बौद्धांची लोकसंख्या 65 लाख 31 हजार 200 आहे.अरुणाचल,छत्तिसगढ,हिमाचल,जम्मूकाश्मिर,कर्नाटक,मध्यप्रदेश,मिझोराम ,सिक्किम,त्रिपूरा,उत्तरप्रदेशात, प.बंगालमध्ये एक लाखाच्या वर तर काही राज्यात दोन लाखाच्या वर बौद्धांची नोंद झाली आहे.

इतर उर्वरित राज्यात पन्नास हजाराच्या आत नोंद आहे.28लाख,67हजार,303 लोकांनी जात व धर्मच लिहिला नाही.

अल्पसंख्यांकाचा दर्जा घेतला  तर बौद्धांची लोकसंख्या वाढते व अनुसूचित जातीचा म्हणजे महार, मांग ,चांभार ,भंगी असा दर्जा घेतला तर हिंदूंची लोकसंख्या वाढते. अनुसूचित जात किंवा धार्मिक अल्पसंख्यांक असे वर्ग निवडण्याचा पर्याय असेल तर बौद्धांनी धार्मिक अल्पसंख्यांक हाच पर्याय निवडावा.

शेड्यूल्ड कास्ट म्हणजे  पददलित व हलक्या जातीचे लोक आहेत ,म्हणून धर्मांतरानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे साधे  सभासद राहण्यास नकार दिला होता.

सवलतीसाठी अस्पृश्य रहायला डॉ.बाबासाहेबांचा विरोध होता हे जातीचा उल्लेख करावा असे सांगणारे का सांगत नाहीत  ?

घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्राम्हण अस्पृश्य होतील काय ? असे डॉ.बाबासाहेब म्हणाले होते .

डॉ.बाबासाहेबांचा धर्मांतराचा हेतु सन्मानाचे व सुरक्षिततेचे जीवन जगण्यासाठीच आहे.अस्पृश्यांना हीन जीवनातून,गुलामीतून ,अत्याचारातून,अमानुष छळातून सुटका करण्यासाठीच डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते.

बौद्ध महार, बौद्ध मांग ,बौद्ध चांभार,बौद्ध भंगी म्हणून अस्पृश्यता नष्ट होईल काय ? इतर हिंदू तुम्हाला सन्मानाची वागणूक देतील काय ? अस्पृश्य जातीत तरी रोटी बेटी व्यवहार होईल काय ? आपले पारंपरिक ,तिरस्कृत,घाणेरडे व्यवसाय व रुढी पालन करुन अस्पृश्यातील 59 जातीमध्ये तरी एकोपा व सांघीक जीवन पद्धती अंगीकारली जाईल काय ? पारंपरिक व्यवसाय न सोडता म्हणजे चांभारकी,येसकरी, केरसूण्या व दोरखंडे तयार करणे व भंगीकाम करुन केवळ बौद्ध म्हणून नोंद करुन हिंदू आपणाला समानतेने वागविल काय ?खेडोपाडी असे घृणास्पद व्यवसाय करणाराची काय स्थिती आहे ? योगीमहाराजांनी तर उत्तरप्रदेशात फैजापूर येथे जातनिहाय पारंपारिक व्यवसायाची पदवी मिळण्यासाठी कॉलेज सुरु केले आहे.त्यात चांभार,मांग,तेली ,न्हावी अशा अनेक व्यवसायाचे कौशल्ये निर्माण करण्याचे ट्रेनिंग सुरु केले आहे.म्हणजे आपल्या मुलांनीही त्यातच गुंतून रहावे.

खरे म्हणजे ही लढाईच आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची आहे.म्हणून आपण जनगनणेत धर्म बौद्ध व जातही बौद्धच लिहावी.बौद्धात जाती नाहीत.परंतु केवळ रकान्यात ----लिहिला तर तेथे जात लिहिण्याची शक्यता आहे.

बौद्ध महार ,बौद्ध मांग,बौद्ध चांभार म्हणून नोंदी करुन बौद्ध धर्माची विटंबना करु नये.

जर अशीच नोंद केली तर हीच भटाळलेली माणसे भारतात बौद्ध धर्मच अस्थित्वात नाही असे बौद्ध राष्ट्रांना सांगतील.त्यासाठी बौद्ध लिहून मूळ जात लिहा असा प्रचार करणारांची मानसिकता व वृत्तीही पहाणे गरजेचे आहे

काही चर्मकार समाजाचे नेते,बुद्धिष्ट सोसायटीचे नेते , सेवानिवृत्त जज्ज,त्यांचे हस्तक पत्रके व मुलाखती प्रसिद्ध करुन धर्म बौद्ध लिहून मूळ जात जी महार,चांभार,मातंग,भंगी आहे अशी नोंद करावी असे सांगतात व प्रचार करतात.असे लिहिण्याचे कारण अनुसुचित जातीचे आर्थिक बजेट कमी  होते,राजकीय व नोकऱ्याचे आरक्षण कमी होते,महामंडळाचे बजेट कमी होते असे सांगतात.

वास्तविक पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या अस्पृश्य जाती आपले मूळ व्यवसाय सोडण्यास तयार नाहीत.अल्पभांडवलात आपली गुजराण होते.भले लोकांनी वाईट अथवा तुच्छ लेखो.कारण स्वार्थाने ते आंधळे झालेले असतात. हिंदू म्हणून जगण्यातच त्यांना अभिमान वाटतो.म्हणून सर्व रुढी ,परंपरा पाळत असतात.फक्त अन्याय अत्याचार झाला की मग डॉ.आंबेडकर व कायदा आठवतो.व पून्हा ते नाईलाजाने विसरुन ही जातात.व पुन्हा येडाई,जानाई,सिरसाई,यल्लामा,आंबाबाईच्या दारात खेट्या घालून नवस फेडतात व त्यासाठी कर्जबाजारी होतात.

एक वेळ ब्राम्हण बौद्ध होईल ,मराठा व माळी बौद्ध होतील परंतु चर्मकार बहुसंख्येने बौद्ध होणार नाहीत .हे त्यांच्या नेत्यांनाही माहित आहे.कारण ते आपला पारंपारिक व्यवसाय व रुढी,अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत.

मग त्यांना जनगणनेत धर्म बौद्ध लिहून मूळ जात महार,मातंग,चर्मकार,भंगी वगैरे लिहावे असा प्रचार करण्यामागे कोणता आदर्श हेतु आहे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads