उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पिडीत कुटुंबियांना 'Y' सुरक्षा द्या :- चंद्रशेखर आझाद
उत्तर प्रदेश मधील हातरस येथील दलित मुलीवर बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली.
उपचार सुरू असताना त्या मुलीचा मृत्यु झाला आहे पिडीत कुटुंबाची विविध पक्षांकडून भेट घेऊन सांत्वन केले जात आहे
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी :
काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी एकत्रित कुटुंबाची भेट घेतली आहे आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे त्या मुलीला न्याय मिळवून देऊ असेही म्हटले आहे.
चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण :
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांनी सदर कुटुंबाची भेट घेतली ,तेथील पिडीत कुटुंब सुरक्षित नसून त्यांना 'Y'श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे
या घटनेचा सुप्रीम कोर्टाचे निगराणीखाली चौकशी करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा