बिहार मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, काॅग्रेसने आमच्या सोबत यावे . - बाळासाहेब आंबेडकर
महाराष्ट्र - बिहारच्या राजकारणात रंगत वाढत आहे. वेगवेगळे पक्ष समविचारी पक्षांशी आघाडी करण्यात गुंतलेले आहेत . विकासाच्या राजकारणा पेक्षा बिहार मध्ये जातीचे राजकारण जास्त होते.
काॅग्रेसने RJD सोबत आघाडी झाली नाही तर आमच्या सोबत येऊन नेतृत्व करावे.
काॅग्रेस सोबत महाराष्ट्रात गठबंधन झाले नाही ते बिहार मध्ये होऊ शकते?
बिहार मध्ये चंद्रशेखर आजाद ऊर्फ रावण यांची आझाद समाज पार्टी, पप्पु यादव यांची जनाधिकार पार्टी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे.
त्यामुळे बिहार निवडणूकीत रंगत आली आहे.
मागच्या वेळेस राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल ( यु )
यांचे गठबंधन झाले होते. पण जनता दल ( यु ) ने भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती आणि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.
यावेळेस मात्र राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे.
काँग्रेसला बिहार निवडणूक सोपी जाणार नाही, काँग्रेसला बिहार मध्ये सत्ता स्थापन करता येणार नाही कारण तसा जनाधार नाही.
त्यामुळे काँग्रेसने आमच्या सोबत यावे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा