News 18 India आणि Zee news चॅनेलवर शंभर कोटींची मानहानीची केस करणार - चन्द्रशेखर आजाद
उत्तर प्रदेश मधील हातरस येथील दलित मुलीवर बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली होती ,तिच्यावर उपचार चालू असताना त्या मुलीचा मृत्यु झाला होता . उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते यावेळेस त्या मुलीच्या कुटुंबातील कोणीही तिथे उपस्थित नव्हते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतभर संताप व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना त्या पीडित कुटुंबाची भेटही घेऊ दिली नाही.
उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली त्यामुळे राहुल गांधी हे जमिनीवर कोसळले होते.
भीम आर्मी चे प्रमुख आणि आजाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनी यावर आवाज उठवला ,त्यांनी त्या पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. तसेच या पीडित कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकारने Y क्षेणीची सुरक्षा देण्याची मागणी केली.
या प्रकरणाला जातीय वळण लागून येथील सवर्णांनी आरोपीची बाजू लिहून देते एक मीटिंग आयोजित केली होती. यावेळेस 18 ठिकाणी वेगवेगळे जातीय दंगलीचे गुन्हे पोलिसांनी नोंद केली होते.
यात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस यांनी या दंगलीसाठी विदेशी फंडिंग झाल्याची खबर दिली त्यामुळे न्यूज एटीन इंडिया आणि झी न्यूज चैनलने भीम आर्मीने विदेशी फंडिंग केल्याची फेक न्युज चालवली होती.
त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांनी भीम आर्मी बहुजन समाजाचा गौरव आहे, आमच्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड करणार नाही म्हणून या चॅनेलवर शंभर करोडची मानहाणीची केस करणार असल्याचे आणि नोटीस देणार असल्याचे ट्विट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा