महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट! - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत केले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी चर्चा काही ना काही कारणाने सारखी होत असते त्यात वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात डिसेंबरपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत करून मोठी खळबळ उडवून दिली आहे.
केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वारंवार संघर्ष आपल्याला दिसत आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकार वारंवार धुडकावून देत आहे. केंद्राने आत्ताच तयार केलेला कृषी कायदा महाराष्ट्रातील लागू होण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही उलट त्यावर विचार करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे.
यासारखे होणाऱ्या संघर्षातूनच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे बाळासाहेब आंबेडकर यांना वाटते.
शेतकऱ्यांच्या हिताचे अन फायद्याचे असणारे कायदे लागू करू, शेतकऱ्यांच्या हिताशी कसलीही तडजोड करणार नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
प्रकाश आंबेडकर उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन महाराष्ट्रात आले आहेत.
त्यांनी या अगोदरही महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन केले आहे. महाराष्ट्रातील देवळे खुले करा त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासाठी साठी आंदोलन केले होते . त्यावेळेस त्यांच्या सह बाराशे जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा