वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर सातारा आणि सुप्रीम कोर्टाचे वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल झाला आहे.
काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती , त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही छत्रपतींवर जहरी टीका केली होती.
त्यामध्ये त्यांनी एक राजा बिनडोक आहे तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे पण ते इतर गोष्टींवर भर देत आहेत आरक्षणापेक्षा असे म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाचे वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ही छत्रपती घराण्यावर टीका केली होती.
मराठा आरक्षणासाठी दोन्ही राज्य नेतृत्व करत आहेत पण त्यामध्ये संभाजीराजे खूप सक्रिय झाले आहेत.
साताऱ्याचे राजे छत्रपती उदयनराजे असे म्हणाले होते की आम्हाला आरक्षण नाही तर कोणालाच नको.
वंचित चे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी अगोदरच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दहा तारखेला जो बंद आहे त्यालाही आम्ही पाठिंबा देत आहोत असे घोषित केले.
महाराष्ट्रातले सामंजस्य बिघडू नये असे वंचित चे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगून मराठा आरक्षणासाठी जो बंद आहे त्याला जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा