हे आहेत प्रवीण कुमार D.M. District Magistrate हाथरस..... - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

हे आहेत प्रवीण कुमार D.M. District Magistrate हाथरस.....

 हे आहेत प्रवीण कुमार D.M. District Magistrate हाथरस....


  हे गाव ज्या जिल्ह्यात येतं त्या जिल्ह्याचे IAS अधिकारी ! पोलीस आणि महसूल प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात  संपूर्ण जबाबदारी आणि सर्व अधिकार असणारा प्रमुख अधिकारी! पीडितेच्या मृतदेहाला मध्यरात्री जाळण्यात प्रत्यक्ष महत्वाची  भूमिका असणारा अधिकारी.! नंतर पीडितेच्या कुटुंबाला धमकवणारा आणि सर्वांना बंदी बनवून मोबाईल हिसकावून घेणारा हा अधिकारी.! मीडियाला पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना भेटता येऊ नये यासाठी परिसराला छावणीचं रूप दिलंय.  लपून छपून आलेल्या पीडितेच्या छोट्या भावाने म्हटलंय की  स्वतः या DM नी नातेवाईकाच्या छातीत लात घातलीय.



                 UPSC ही भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित IAS, IPS आणि IFS अशा अत्यंत महत्वाच्या सेवांमध्ये अधिकाऱ्यांची निवड करणारी संविधानिक  संस्था आहे. याची निवड प्रक्रिया जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कठीण प्रक्रिया समजली जाते. मला यासंदर्भाने  खूप गंभीर प्रश्न पडलाय. सर्वसामान्य अन्यायग्रस्त लोकांशी अत्यंत अन्यायपूर्ण व खालच्या पातळीचं वर्तन करणारी आणि कायदा व सुव्यवस्था सुव्यवस्थित धाब्यावर बसवणारी असली कोडगी माणसं जर एवढया कठीण प्रक्रियेतून निवडली जात असतील तर, UPSC ने यावर गंभीर विचार करावा. निवडप्रक्रिया योग्य अधिकाऱ्यांची निवड करण्यात अपयशी ठरत आहे काय, यावर विचार व्हायला हवा. बुद्धिमान असणारी पण भावनाशून्य संवेदनाहीन अधिकारी सर्वसामान्यांच्या भावना, दुःख,  वेदना कधीच समजू शकणार नाहीत.


                  प्रवीण कुमारची मुलाखत घेणाऱ्या मुलाखत पॅनेलने स्वतःवर प्रश्न उपस्थित करावेत. IAS केडरची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारं गैरवर्तन करणारा असा अधिकारी निवडला कसा गेला!? 

आणि मसुरीमध्ये लबास्ना केंद्रातील प्रशिक्षकांनी सुद्धा प्रशिक्षणाचा दर्जा तपासून पहावा. नैतिक मूल्य आणि प्रशासकीय मूल्य रुजवण्यात अपयशी ठरत नाही आहात का याचा गांभीर्याने विचार करून स्वयंमूल्यांकन करावं. अखिल भारतीय सेवा ही भारतीय प्रशासन व्यवस्थेतील अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठित सेवा आहे; त्याचं असं पतन फार लज्जास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads