अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे राज्याचे मुख्यमंञी मा.उद्धवजी ठाकरे यांना पत्र..
12 ऑक्टो.ला पदोन्नतीतील आरक्षण केस सुनावणी सुप्रीम कोर्टात आहे.तर सुनावणी पुर्वी शपथ प्रञाने आकडेवारी सादर करावी व SLP -28306/2017 प्रकरणी सरकारची बाजु मांडण्यासाठी शासनाने निष्णात वरिष्ठ वकिल कपिल सिब्बल सारखे वकिलाची नेमणुक करावी..
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी काल झालेल्या ‘पदोन्नतीमधील आरक्षण’विषयी महत्वपूर्ण बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे आपल्या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अनुषंगाने हे महत्वाचे पाऊल आहे.
मागासवर्गीय अधिकारी - कर्मचारी यांच्या शासकीय सेवेतील पदोन्नतीमधील आरक्षणासंबंधी मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस संदर्भात मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महत्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले.
मा. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती यांच्या हक्काचे पदोन्नतीमधील आरक्षण टिकविणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अविरत प्रयत्न करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा