मराठा आरक्षणासाठीच्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा :- प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाला अगोदरच पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे बंदला पाठिंबा प्रेस कॉन्फरन्स मार्फत जाहीर करतोय असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजासाठी असणारे आरक्षण वेगळे आहे आणि ओबीसी समाजासाठी असणारे आरक्षण वेगळे आहे . या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवले आहे.
आरक्षण संघर्ष समिती आहे किंवा इतर जण आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ पर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाचे संघटन आहे यात कलह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा सामंजस्य बिघडेल अशी परिस्थिती दिसत आहे .महाराष्ट्राच्या सामाजिक स्थिती बिघडू नये म्हणून दहा तारखेच्या बंदला वंचित बहुजन आघाडी तर्फे पाठिंबा जाहीर केला आहे.मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व दोन राजांनी करावे यात एक राजे सक्रिय झाले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे तुम्ही त्यांना पाठिंबा देता का ? त्यांचे नेतृत्व मान्य आहे का ? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे अस मला कुठेही वाचण्यात आले नाही, उलट एक राजा तर बिनडोक आहे असे मी त्या ठिकाणी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे पण ते इतर गोष्टींवर भर देत आहेत आरक्षणापेक्षा असे मी म्हणेन .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा