एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ...काय म्हणाले फडणवीसांना ? - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ...काय म्हणाले फडणवीसांना ?

एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ...काय म्हणाले  फडणवीसांना ?

 जळगाव -  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला धक्का दिला आहे. त्यांनी आज भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यात दोन ओळी लिहिल्या आहेत त्यांनी , "मी एकनाथ गणपत खडसे माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे " असे लिहिले आहे.


            त्यांनी असेही म्हटले आहे की, " गेली 40 वर्षे मी भाजपला वाढवण्याचं काम केल. पक्ष घराघरात नेण्यासाठी कष्ट घेतले. पक्षांना मला अनेक पद दिली हे मी कधीही नाकारणार नाही. माझी पक्षावर नाराज नाही. केवळ एका व्यक्तीवर आहे ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.

एकनाथ खडसे हे भाजपमधून मुक्ताईनगर या मतदारसंघातून सहा वेळा आमदार झाले आहेत. 

1995 - 1999 या काळात एकनाथ खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते.

2009 - 2014 या काळात भाजपचे विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले.

2014 - 2016 या काळामध्ये 12 खात्याचे मंत्री होते.

2014 या काळात मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव गाजत होते.

2016 मध्ये एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

2016 मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2019 मध्ये भाजपने विधानसभेचे एकनाथ खडसे यांचे तिकीट कापले.


एकनाथ खडसेंवर खोटे आरोप झाले. माझ्यावर बनावट खटला दाखल केला असे त्यांनी म्हटले आहे.


या सगळ्यांवर एकनाथ खडसे यांची खूप दिवसांपासून नाराजी होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यामध्ये शुक्रवारी प्रवेश करणार आहेत.


यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत , जसे की.

1) जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वजन वाढेल का ?

2) खानदेशात भाजप कमजोर होईल का ?

3) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होईल का ?

4) महाविकास आघाडी मध्ये मंत्री बनतील का ?

5) देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तापणार का ?

6) ओबीसी मध्ये अन्याय झाल्याची भावना होईल का ?

7) जमीन व्यवहाराचा प्रकरण मोडीत निघेल का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads