नुकसानग्रस्तांना साठी पॅकेज घोषित.. 10,000 कोटींची मदत जाहीर.
मुंबई - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात महापूर किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आणि नुकसान ग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.
हे मदतीचे पॅकेज खालील प्रमाणे आहे :-
ज्यांच्या शेतामध्ये पाणी किंवा महापुरामुळे नुकसान झालेले आहे अशा जिरायत आणि बागायत साठी हेक्टरी दहा हजार आठशे रुपये देण्यात येणार आहेत
ज्या शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई साठी हेक्टरी 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत
ज्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले आहे किंवा पुराच्या पाण्यामुळे घरांचे नुकसान झाले अशा नुकसान ग्रस्तांसाठी 5500 कोटी रुपये घोषित करण्यात आले आहेत
आज झालेले प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महापुर किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी मोठे पॅकेज घोषित केले ते दहा हजार कोटींचे आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रात जिथे जिथे महापुरामुळे नुकसान झाले तिथे दौरे केले त्यामध्ये सोलापूर येथील अक्कलकोट असेल अजून मराठवाडा असेल किंवा ते कोकणचा दौरा करणार आहे.
यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा नुकसानग्रस्त लोकांनी एकच मागणी केली होती की भरपाई कधी मिळणार किंवा नुकसान झालेली शेती असेल घर असेल यांच्यासाठी मदत कधी जाहीर होणार ?
विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर वारंवार आरोप होत होते की नुसती दौरे करून चालणार नाही किंवा लवकरात लवकर मदत जाहीर करा.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असे म्हटले आहे की त्यांना केंद्राकडून कडून पैसे आलेले नाहीत .
केंद्र कडून 38 हजार कोटी येणे बाकी आहे .चक्रीवादळ साठी दीड हजार कोटी येणार होते तेही आलेले नाहीत.
वारंवार सांगून सुद्धा केंद्राकडून दखल घेतली जात नाही जे केंद्राकडून नुकसानग्रस्त पाहणी करण्यासाठी पथक येते ते अजून आलेले नाही.
संकटात बळीराजाला मदतीची गरज असते आणि ते करणे आवश्यक आहे. दिवाळीपर्यंत प्रत्येक नुकसानग्रस्तांना किंवा आपत्तीग्रस्तांना मदत मिळेल असे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा