माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असला तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असला तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असला तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


बौद्ध धम्म स्वीकारण्याची ईच्छा होती म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वकच बौद्ध धम्म स्वीकारला - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि. १८ - बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून विज्ञानावर आधारित बौद्ध धम्माची मांडणी केली आहे. हिंदू धर्मात अस्पृश्यांना मानवतेचे समतेचे अधिकार नव्हते तर बौद्ध धम्म हा समतेवर आधारलेला धम्म आहे. हिंदू धर्मातील कर्मठ  वर्ग अस्पृश्य वर्गाला न्याय हक्क देण्यास तयार नव्हते. हिंदू धर्मात अस्पृश्यांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल होत नसल्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगत धर्मांतराची घोषणा १३ ऑक्टोबर १९३५ रोजी केली त्यानंतर अत्यंत विचारपूर्वक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून काही माध्यमांत माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्वीकारण्याची ईच्छा नव्हती असे मी कधीच बोलू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्वीकारण्याची ईच्छा होती म्हणून त्यांनी विचारपूर्वक बौद्ध धम्म स्वीकारला असे माझे म्हणणे आहे. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याने त्यातून उलटसुलट चर्चा होत असल्याने मी याप्रकारणी दिलगिरी व्यक्त करीत आहे असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.


नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण दरवर्षी दिक्षाभूमीला जात असतो. यावर्षी पत्रकारांशी नागपूर मध्ये वार्तालाप करताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. त्यातून समाजात माझ्याबद्दल गैरसमज झाला असल्याने मी स्पष्ट दिलगिरी व्यक्त करतो. मात्र मी असे चुकीचे कधीही बोलू शकत नाही. मी स्वतः बौद्ध आहे. अनेक धम्म परिषदा मी स्वतः घेतलेल्या आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई येथे धम्म दिक्षा सोहळा आयोजित करण्याची ईच्छा होती मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. धम्मदिक्षा सुवर्ण महोत्सव २००६ साली महालक्ष्मी रेसकोर्स येथे साजरा करून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते स्वप्न पूर्ण केले असे सांगत आपण वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप चे जागतिक उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.त्यामुळे मी काही चुकीचे म्हणण्याचा प्रश्नच नाही. असे ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.


डॉ बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून बौद्ध धम्माचे ज्ञान होते. केळुस्कर गुरुजी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भगवान गौतम बुद्धांचे चरित्रपर पुस्तक भेट दिले होते तेंव्हापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माचे ज्ञान होते. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतर करण्याची येवले येथे घोषणा केल्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली.बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहून विज्ञानावर आधारित बौद्ध धम्माची मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या बद्दल गैरसमज करू नये.आपण सर्व समाजाने एकजुटीने राहणे आवश्यक आहे. असे ना.रामदास आठवले म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads