मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र लिहिले आहे, त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की ;
महोदय ,
दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत म्हणजेच बार्टी मार्फत उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी दोन लाख रुपयांचे विशेष अनुदान दिले जाते.
मात्र ,
गेल्या वर्षभरापासून संस्थेतर्फे लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
नीट, सीईटीसारख्या परीक्षेची तयारी करणे अवघड बनले आहे.
तरी , आपण याप्रश्नी लक्ष घालून विद्यार्थ्यांना अनुदान मिळण्याची व्यवस्था करावी ही नम्र विनंती असे पत्र नाना पटोले यांनी सामाजिक न्यायमंत्री यांना लिहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा