दरवाढी विरोधात पंतप्रधानांना पत्र पाठवणार - रूपाली चाकणकर
आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर, डाळी, खाद्यतेल दरवाढीच्या विरोधात राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी रूपाली चाकणकर यांनी असे सांगितले आहे की, "महाराष्ट्रातल्या माझ्या महिला भगिनी या दिवाळीच्या सणामध्ये चिंतेत आहेत की आता दिवाळी गोड कशी करावी. या महागाईमध्ये खाद्य तेल, डाळी, गॅस सिलेंडर इतका वाढला आहे याची चिंता त्यांना सतावत आहे. म्हणून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात भाजपा मंत्री, खासदार, आमदार, महापौर,लोकप्रतिनिधी सगळ्या पर्यंत या पत्राद्वारे निवेदन देत आहोत की, आपण महागाईचा उच्चांक गाठलेला आहे आणि आमच्यावर जी संक्रांत ओढवली आहे, त्यासाठी आपण किमान दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि डाळी यामध्ये आमच्या महिला भगिनींना 50 टक्के सवलत द्यावी आणि आमची दिवाळी गोड करावी ही विनंती."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा