सामाजिक न्याय मंत्री निष्क्रिय आहेत, त्यांनी आजवर फक्त दलितांवर अन्याय केला - दिपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

सामाजिक न्याय मंत्री निष्क्रिय आहेत, त्यांनी आजवर फक्त दलितांवर अन्याय केला - दिपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना

सामाजिक न्याय मंत्री निष्क्रिय आहेत, त्यांनी आजवर फक्त दलितांवर अन्याय केला - दिपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना

बीड - ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की,

         "बीड जिल्ह्यात मूलभूत प्रश्न ऐरणीवर आहेत. नात्याच्या भांडणाचे तमाशे सुरू आहेत, विकास नाही पण मनोरंजन जोरात सुरु आहे. बीड जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून तमाशे येत असतात कोरोनामुळे ते बंद आहेत. परंतु परंपरा राजकारण्यांनी बंद पाडलेली नाही. बहीण भावाला भांडते, पुतण्या चुलत्याला भांडतो याच रूपांतर तमाशात होतात. 

अंतर्गत नाले, रस्ते, शहराचा विकास काहीही झालेला नाही. लोकांना आता यांच्याकडून अपेक्षा राहिलेली नाही. शहर वाढतंय त्याला आकार दिला जात नाही. मागासलेला जिल्हा हीच ओळख येथील राजकारण्यांनी ठेवली.

या जिल्ह्यातील नेत्यांनी देशाची राज्याची प्रमुख मंत्रिपद भोगली गेली, स्वविकास झाला बीडचा विकास झाला नाही. महाविकास नावापुरतं राहील तर महाभक्कास ओळखलं गेलं. 

आम्ही नवा पर्याय उभा करणार आहोत, सर्व स्तरावर लढणार आहोत. परिवर्तन क्रांती निर्माण करावी लागणार.

अनुसूचित जाती जमातीला वाचवण्याचा अजेंडा लढणार आहोत हीच आमची भूमिका आहे. 


सामाजिक न्याय मंत्री निष्क्रिय आहेत, त्यांनी आजवर फक्त दलितांवर अन्याय केला. दलित अत्याचारांना भेटी दिल्या नाहीत. सर्वात जास्त आंदोलन धनंजय मुंडे यांच्या विरोधात केली. बीड जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर झाला पाहिजे सामाजिक न्याय मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. 

रमाई आवास योजनेच्या घरकुलला 128000 रुपये दिले जातात. त्यात 2000 हजार रुपये सरपंच, ग्रामसेवक, इंजिनियर घेतात असे अनेक प्रकरण समोर येत आहेत. ही निवाऱ्याची पैसातली लूटमार निंदनीय आहे. 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 128000 रुपयात घरकुल बांधून दाखवावी. या योजनेची थट्टा सुरु आहे. हप्त्यामध्ये पैसे देणे सुद्धा पिळवणूक आहे. 5 लाख रुपये रमाई घरकुल योजनेला दिले पाहिजेत आणि तेही एका हप्त्यात तरच ही योजना कामाची आहे अन्यथा ही गरिबांची निवर्यासाठी थट्टा आहे. याविरोधात व्यापक लढा उभा करणार आहोत."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads