फडणवीस यांचा फोन आला होता का नाही याचा अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा- वंचितची मागणी
वंचितला हरवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदारांचा स्पष्ट कल दिसून येत असून भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात जनभावना असल्याने काँग्रेस आणि भाजप उमेदवाराचा पराभव अटळ आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजप याव्यतिरिक्त तिसरा पर्याय उभा राहू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेले आहेत. यासंदर्भात बोलणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण यांना फोन आला होता की नाही याचा खुलासा त्यांनी करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात येत आहे.
देगलूर-बिलोली मतदारसंघात आलटून पालटून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला आणि भाजपला याठिकाणी मतदारांनी नाकारले आहे. पैसे वाटूनही लोक त्यांना त्यांच्या प्रचारात सहभागी व्हायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा देगलूर येथे झाली. मतदार संघातील मतदारांचा कल स्पष्ट झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकून विधानभवनात जाऊ नये यासाठी हे दोन्ही पक्ष गलिच्छ राजकारण खेळत आहेत असे रेखा ठाकूर प्रदेशाध्यक्ष (प्रभारी) वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा