छत्रपती संभाजी महाराज यांनी सोलापूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी विहारास म्हणजेच प्रेरणाभूमीला भेट दिली.
सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यानिमित्त सोलापूर येथे आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी विहारास भेट दिली.
त्यावेळी त्यांनी असे म्हटले की,
" 'प्रेरणाभूमी' म्हणजेच डॉ. बाबासाहेब यांचे अस्थीकलश असलेली भूमी होय. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त तीनच शहरांमध्ये डॉ बाबासाहेब यांच्या अस्थींचं दर्शन प्राप्त होतं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणनंतर त्यांच्या अस्थी या मुंबईतील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी आणि सोलापूरातील प्रेरणाभूमीत ठेवलेल्या आहेत.
बहूजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी, वंचितांच्या न्याय हक्कासाठी मागास राहिलेल्यांना सामाजिक प्रतिनिधित्व देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या आरक्षण पद्धतीनुसार अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. माणसाला माणसासम वागणूक मिळावी हा उद्देश डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा होता.
मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यानिमित्त सोलापूर येथे आलो असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहारास भेट देऊन बाबासाहेबांच्या स्मृतींस अभिवादन केले."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा