नागपुरात 40 शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रफुल पटेल यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश..
40 Shiv Sena workers join NCP in Nagpur in the presence of Praful Patel
नागपूर - नागपूर येथील अक्षय भवन, नंदनवन रोड नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दिवसेंदिवस महांगाई वाढतच चालली आहे. आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढतच आहेत. जनता महागाईने त्रस्त आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नवीन कृषी कायदे आणून शेतकर्यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपची मागील काही वर्षांपासून सत्ता आहे. परंतु भष्ट्राचाराने पालिकेला पोखरण्याचे काम सत्ताधारी लोक करत आहेत, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारद्वारे लखीमपुर खीरी येथे शेतकर्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पाळणार आहेत. शांततामय मार्गाने बंद मध्ये सामील होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रफुल्ल पटेल यांनी केले.
या कार्यक्रमास रमेशचंद्र बंग, सुबोध मोहिते पाटिल,शेखर सावरबांधे, शब्बीर विद्रोही, प्रवीण कुंटे पाटिल, दुनेश्वर पेठे, आभाताई पांडे, दिलीप पनकुले, दीनानाथ पडोळे, प्रशांत पवार, लक्ष्मीताई सावरकर, जानबा मस्के, अनिल अहिरकर, ईश्वर बाळबुधे, सुखदेव वंजारी, वर्षाताई शामकुळे, वेदप्रकाश आर्य, शशिकांत ठाकरे, दाऊदभाई शेख, बजरंग परिहार, शैलेंद्र तिवारी, एड. स्वाती कुंभलकर, नूमन रेवतकर, पूनम रेवतकर, कमलाकर घाटोळे, रमेश फुले, श्रीकांत शिवणकर आणि पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागपूर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या नेतृत्वावर व विचारधारेवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केलेल्या सर्व प्रवेशितांचे स्वागत करण्यात आले.
प्रमोद मोरघडे, सौ. जयश्री शंकरराव जांभुळे, सौ.नीलम शेखर उमाठे नंदू थोटे, मुन्ना रफिक, संजय मोहरकर, प्रवीण काकडे, राजू सुरकार, दीपक आदमने, दीपक येवले, विनय सावळकर, राम आमटे, राजेश रुईकर, बाळू आष्टणकर, प्रवीण राऊत, ज्ञानवंत रामकर,अशोक अंतुरकर, आशिष राऊत, अनुप सावरकर, नंदू मोहरकर, सुनील जासूद, विष्णू बराई, रामकृष्ण भांगे, शेषराव कोरे, राजेश मेंढे, राजेश राजगिरे, अशोक मानकर, हसमुखभाई पटेल, मंगेश खंडाळकर, कपिल डांगरे, पप्पू बोन्द्रे, अक्षय गुनारकर, सुनील विभुते, संतोष आकरे, विलास डोंगरे, राजेश कोलारकर, क्रांती ढोक, प्रशांत चावके, रवींद्र लांबट, विजय नाईक, शशिकांत ठाकरे, आकाश पांडे, तुषार कोल्हे, कुलदीप उपाध्यय, प्रकाश पेटकर, बादल नागपुरे, पंकज पिलारे, अमोध धोपटे, नीरज तरार, अक्षय देवतळे, चक्रवर्ती रायबोले, पावन बनकर, उजर खान, आशिष गेडाम, श्री वाघे, रजत यादव, अमोल मनलेकर, मनोहर खुजराने, सुरेंद्र रागीट, रोशन हारगुडे यांचा पक्ष प्रवेश यावेळी पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा