सोलापूर पुनर्वसन विभागाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचा आरोप.
मुंबई येथील आझाद मैदान मंत्रालय येथे आंदोलनाचा इशारा.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले चौकशीचे आदेश ...
Indefinite protest against arbitrariness of brokers and corruption at Azad Maidan - Republican Party of India Union Secretary Deepak Chandanshive
पंढरपूर / प्रतिनिधी - सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले असून याबाबत चौकशीचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांना मंत्री वडेट्टीवार यांनी दिले असल्याची माहिती यावेळी चंदनशिवे यांनी सांगितली.
याप्रसंगी दत्ता वाघमारे, समाधान बाबर, खंडू बाबर, विजयकुमार खरे, राजकुमार भोपळे महादेव सोनवणे, श्रीनाथ बाबर, नागनाथ मोरे, विश्वजित मोरे, विजय वाघमारे, रवी भोसले, भास्कर चंदनशिवे उपस्थित होते.
प्रकल्प ग्रस्तांच्या मिळालेल्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात साखळी तयार झाली आहे. दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकरणांमुळे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सातारा,पुणे व इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर,मंगळवेढा माळशिरस,माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सदर प्रकल्पग्रस्तांना जमीन खरेदी,विक्री व्यवहारात दलाल, अधिकारी व कर्मचारी यांची साखळी तयार झाली आहे. अशी मिलीभगत करून प्रकल्पग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कमी किमतीत जमिनीची खरेदी करून दाम दुप्पट दराने जमीन विक्री केली जात आहे. यामुळे सर्व सामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना जादा आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे काही पुनर्वसन खरेदी,विक्री व्यवहार ही रद्द झाले असल्याचे आदेशही निघाले आहेत. काही प्रकल्पग्रस्तांचे एकाच आदेशावर दोन दोन ठिकाणी जमिनी खरेदी करून झालेल्या आहेत तर काही जमिनी खरेदी विक्रीच्या प्रकरणांचे कोर्ट केस असताना विक्री झालेल्या आहेत तरी काही खरेदी-विक्री केलेल्या जमिनीत शासकीय अनुदानाचा लाखो रुपयांचा लाभही घेतला. आशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावे अन्यथा मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा