सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात मॉंसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढच पुतळा झाला पाहिजे - आमदार गोपीचंद पडळकर
Punyashlok Ahilya Devi Holkar University in Solapur should have a statue of Masaheb Punyashlok Ahilya Devi Holkar on horseback - MLA Gopichand Padalkar
सोलापूर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी असे सांगितले आहे की , "सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात मासाहेब अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा प्रस्तावित आहे ही महाराष्ट्रातील लोकांची भावना आहे तसा प्रस्ताव मागील समितीमध्ये घेण्यात आला होता परंतु महाराष्ट्रातील लोक भावनेचे विरुद्ध जाऊन शिवपिंडधारी पुतळा बसवण्याचं नवीन समितीनं ठरवलेला आहे हे खर आहे माॅसाहेबांचा शिवपिंडधारी प्रतिमा लहानपणापासून आपल्या मनात मनामध्ये रुजलेली आहे. परंतु शास्त्र आणि शस्त्र यांची शिकवण देणाऱ्या अहिल्यादेवींचा पराक्रमी चेहरा लोकांच्या समोर आला पाहिजे. शिवपिंडधारी पुतळे इंदूर पासून जेजुरी पर्यंत अनेक ठिकाणी बसविण्यात आले आहेत, पण अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळा बसवणे मध्ये कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही किंवा कुणाचाही मनामध्ये दुमत असण्याचे कारण नाही .परंतु जाईल तिथे राजकारण करणारे पोस्टर बाॅय यामध्ये खोडा घालण्याचे ठरवलेला आहे, म्हणून विद्यापीठाचे कुलपती आणि राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्याकडे माझी मागणी आहे की, सोलापूर विद्यापीठाला आदेश द्यावे. सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी चा अश्वारूढ पुतळा बसला पाहिजे हीच परत एकदा माननीय राज्यपालांना विनंती आहे. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा