शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीत त्यांना अटक करा - अॅड गुणरत्न सदावर्ते - लोकराजा

Breaking News

Adsense ad

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीत त्यांना अटक करा - अॅड गुणरत्न सदावर्ते

शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत त्यांना अटक करा - अॅड. गुणरत्न सदावर्ते

Sharad Pawar and Dilip Walse-Patil are not bigger than the law, arrest them - Adv Gunaratna Sadavarte

पुणे - पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खूप गर्दी झाली होती. सगळ्या कोरोना नियमांचे उल्लंघन तिथे झाले होते.

कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य लोकांनाच आहेत का ? राजकारणी आणि मंत्री लोकांना नाहीत का ? या गर्दीमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो लोक संक्रमित होऊ शकतात . त्यामुळे ही गर्दी किंवा सभा आयोजित करणाऱ्यांविरुद्ध म्हणजे शरद पवार , दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.


शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का ? आणि कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पुण्यात भरभरून गर्दी करून केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे आणि इतर लोकांना वेठीस पकडणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल २१ ला हे अभिप्रेत नाही. शरद पवार कायद्यापेक्षा मोठे नाहीत. दिलीप वळसे पाटील तुम्ही मंत्री आहेत. परंतु तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. सामान्यांनी जर विवाहासाठी जास्त लोकं जमवले, तर तिथे धाड पडते. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे तुफान गर्दी जमवतात. माध्यमांत बातम्या येतात. इथे धाड टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना हातात बेड्या पडल्या आहेत का ? शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर कारवाई करा. अन्यथा तुम्हाला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला थांबवता येणार नाही आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माझा तुम्हाला स्पष्ट प्रश्न आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. सामान्यपणे ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसणाऱ्यांना अटक करून तुम्ही Bravery दाखवता. शरद पवारांना अटक करायला तुमच्याकडे Bravery नाही का? अटक करावी लागेल आणि अटक जर नाही केली तर आम्ही Mumbai High Court समोर आणि राज्यपालांसमोर ठेवू असे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads