घनसावंगी तहसीलवर दि. 4 रोजी 'जनशक्ती'चे ट्रॅक्टर आंदोलन
प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वात निघणार भव्य मोर्चा
On Ghansawangi tehsil. Tractor agitation of 'Janashakti' on 4th A grand morcha will be held under the leadership of State President Atul Khupse Patil
प्रतिनिधी - कारखानदारी अडचणीत असल्याचे सांगुन कारखानदार नेहमीच शेतकऱ्यांना व ऊस वाहतुकदारांना अडचणीत आणत आहेत. मग अडचणीत असलेला कारखानदार एका कारखान्याचे २-४ कारखाने कसा उभा करतो हे न सुटलेलं कोडं आहे. मात्र जिवाची ओढाताण करुन यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणारा अजुनही अडचणीतच आहे. डीझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र जैसे थे आहे. आपल्या जिवावर कारखानदार भले मोठे झाले मात्र ऊस वाहतुकदार ट्रॅक्टर व ट्रक मालकांची अधोगती झाली असून याच्या ऊस वाहतूक दर वाढवा अन्यथा दिनांक 4 रोजी घनसावंगी तहसील कार्यालयावर जनशक्ती चे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढणार असा इशारा जनशक्ती नेते कृष्णा पवार व हरीश राठोड यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदारांना दिला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते. आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी वाहतूकदर आणी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. का आत्महत्या सारखा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आमची मागणी शासन दरबारी पोहोचून ट्रक व ट्रॅक्टर मालकांना न्याय द्यावा अन्यथा दिनांक चार रोजी घनसावंगी बस स्टॅन्ड ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वसंत पवार, निवृत्ती पवार , बालाजी मुके, पंजाबराव पवार, प्रशांत पवार, भरत पवार, भारत भोसले, कृष्णा भोसले, सावजी राठोड, कृष्णा लिंगसे, दत्ता आनंदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा