डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर नाशिकचा संवेदन अपरांती हा युवक त्याच विद्यापीठातून झाला बॅरिस्टर - लोकराजा

Breaking News

Adsense ad

गुरुवार, २२ जुलै, २०२१

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर नाशिकचा संवेदन अपरांती हा युवक त्याच विद्यापीठातून झाला बॅरिस्टर

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर नाशिकचा संवेदन अपरांती हा युवक त्याच विद्यापीठातून झाला बॅरिस्टर

नाशिक- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लंडनमधील ग्रेसइन या लॉ कॉलेजमधून बॅरिस्टर झाले होते. तब्बल ९९ वर्षानंतर नाशिकच्या संवेदन अपरांती यांनी याच महाविद्यालयातून बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. नाशिकच्या सुपुत्राने हा बहुमान मिळवल्यामुळे अपरांती यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा शोधत सन २०१७ साली संवेदन अपरांती यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रचंड अभ्यास, यशस्वी होण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आज त्यांनी या यशाला गवसणी घातली.

९९ वर्षाच्या मोठ्या कालखंडा नंतर ज्या युनिव्हर्सिटी मधून  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली होती आज त्याच ग्रेज ईन युनिव्हर्सिटी मधून नाशिकचा सुपुत्र संवदेन संजय  अपरांती याने "बॅरिस्टर" पदवी मिळवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आंबेडकरवादी समाजातील एकमेव विद्यार्थी ठरला असून, ही बाब आंबेडकरवादी समाजासह नाशिकरांसाठी ही गौरवास्पद आहे.

संवेदन हा नाशिकचे रिटा.सुपरिडेंट आँफ पुलिस अधिकारी मा.संजय अपरांती यांचा मुलगा आहे.


बंधू-भगिनींना जय भीम,

ज्या लायब्ररीमध्ये बसुन बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अभ्यास केला.खरंच नतमस्तक होऊन सांगितो इच्छितो आपल्याला जर बाबासाहेब नसते तर माझा मुलगा संवेदन बॅरिस्टर झाला असता का? जेव्हा मी म्हणतोय की माझा मुलगा बॅरिस्टर झाला आहे तेव्हा दुसऱ्या बाजूनेही म्हणतो बाबासाहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला एक बॅरिस्टर दिला.

यानंतर प्रत्येक वर्षी कमीत कमी समाजातुन एक बॅरिस्टर झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

आफ्रिकेतील गाना या देशातील लोकांनी संवेदनच कौतुक केले .आफ्रिकेतील घाना या देशातील लोकांना भेटलो आणि त्यांनाही कळले की बाबासाहेबांचे पुतळे आफ्रिकेत उभारणे गरजेचे आहे. असे संवेदनचे वडील संजय अपरांती म्हणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads