मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी - मनसे प्रमुख राज ठाकरे
गेल्या पंधरा महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वजण पाळत आलो आहोत पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे . त्यातल्या त्यात मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते खरे अनाकलनीय आहेत
मुंबईतील सर्व कार्यालय सुरू आहे, सर्वांना घरून काम करणे शक्य नाही. त्यासाठी त्यांना घरून अनेक तास प्रवास करावा लागतो त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत.
महाराष्ट्र सरकार बस सेवेला परवानगी दिली , पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये खूप गर्दी होत आहे. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोग अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यामुळे नेमकं काय साध्य होणार आहे.
महाराष्ट्र सरकार निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत.
सर्व सामान्य माणसांनी आतापर्यंत सर्व काही सहन केलं आणि आता त्याची सहन करण्याची क्षमता संपत चालली आहे त्यामुळे आता सरकार कडून जर सकारात्मक पावले उचलली नाहीत तर त्याचा कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांच्या सोबत उभा राहीलच पण लोकल सेवा सुरू करावी म्हणून आंदोलन करेल.
त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो की मुंबईकरांचे रोडचे हाल थांबवण्यासाठी मुंबई लोकल सेवा निदान ज्यांनी लसीची दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरू केली जावी.
विविध प्रकारच्या मोहिमा हाती घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकलच्या प्रवासाचा लाभ घेतील आणि मुंबईचा अर्थचक्र पुन्हा सुरू होईल.
मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार सगळ्याचा विचार करून त्वरित पावले उचलेल.
असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा