केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या कडून वंबआ चे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची चौकशी. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, १४ जुलै, २०२१

केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या कडून वंबआ चे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची चौकशी.

केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या कडून वंबआ चे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची चौकशी.

केंद्रीय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या कडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर यांना फोन करून विचारपूस केली. 

 प्रकाश आंबेडकर रुग्णालयात असून त्यांना लवकर डिस्चार्ज मिळेल. ते घरी आल्यानंतर त्यांची भेट घेऊ असे ना रामदास आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याचे कळताच ना रामदास आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांची काळजी घ्या मी लवकर भेटायला येईन असा निरोप दिला. भीमराव आंबेडकर यांनीही ना. रामदास आठवले यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेत लोकप्रिय नेते आहेत .

ते सध्या सामाजिक न्याय विभागाचे  केंद्रीय राज्यमंत्री आहेत. 

आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाली असल्याचे कळल्यानंतर ना रामदास आठवले यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत राजकीय वाटचाल काहीही असो पण आपलेपणा जोपासत ना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत लवकर चांगली सुधारणा होवो, आपण लवकर त्यांची भेट घेऊ असा भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून निरोप दिला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून हलका आहार घेण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडीओ कॉल वरून ते कुटुंबियांशी बोलले आहेत.  

प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही असे डॉक्टरांनी कळविले आहे. असे रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष (प्रभारी) - वंचित बहुजन आघाडी यांनी माहिती दिली आहे. 

तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सुधरत असून आज त्यांना ICU मधून प्रायव्हेट रूममध्ये हलविण्यात आले आहे. नियमित आहार घेण्यास सुरुवात झाली असून वॉर्डमध्ये थोडावेळ चालले आहेत. 

असे फारूक अहमद राज्य प्रवक्ता - वंबआ यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads