वंचित बहुजन आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश. - लोकराजा

Breaking News

Adsense ad

मंगळवार, १३ जुलै, २०२१

वंचित बहुजन आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.

वंचित बहुजन आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच इतर पक्षांतील  कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश..

मिरज - वंचित बहुजन आघाडी सध्या राज्यभरात विविध वंचित समूहाचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण,धार्मिक प्रतीके गैरवापर प्रतिबंध कायदा, ओबीसी आरक्षण, एससी एसटी पदोन्नती आरक्षण,लॉकडाऊन असताना घेतलेल्या समाज उपयोगी भूमिका यामुळे मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहे यामुळे, आज वंचित बहुजन आघाडी सांगली (दक्षिण) जिल्हाध्यक्ष महाविर (तात्या) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली,मिरज येथे नवीन कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश घेण्यात आला.

त्यावेळी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, पीआरपी तसेच इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षांना खिंडार पाडत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश घेत सर्वच प्रस्थापित व्यवस्थेला धक्का दिला आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित समूहातील गरीब घटकांतील बांधवाना सत्तेचे वाटेने जाण्यासाठी अहोरात्र वाटचाल करीत असल्यामुळे त्यांच्या वंचित समाजाच्या तळमळीमुळे प्रेरित होऊन, वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व समाजातील युवा वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.   त्यावेळी,सत्ताधारी शिवसेना,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि  वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणानुसार पक्ष शिस्तेनुसार तळागाळातील वंचित समुहाला बरोबर घेऊन पक्ष वाढीच्या दृष्टीने  प्रामाणिकपणे काम करण्याचे अभिवचन दिले.

वंचित बहुजन आघाडी चे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे यांनी नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व गावा गावात वंचित समाज एकत्र करून शाखा निर्माण कराव्यात व वंचित बहुजन आघाडी मजबूत करून वंचित समाजात जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी सांगली जिल्हा महासचिव उमरफरुक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, गौतम लोटे, मनोहर कांबळे, संजय कांबळे, शेखर पावसे, सनी गायकवाड, केतन माने, प्रशांत वाघमारे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, अशोक लोंढे,श्रीकांत ढाले, दीक्षांत सावंत,किशोर आढाव, पृथ्वीराज कांबळे, प्रशांत कदम, प्रमोद मल्लाडे, सागर आठवले, सतीश शिकलगार, अनिल मोरे, अरुण कांबळे, रवींद्र विभुते, विक्रम कोलप, सिध्दार्थ कांबळे, सर्जराव सावंत, लक्ष्मण देवकर, चंद्रकांत होवाळे, केशव आठवले, तुषार कांबळे, हरीश वाघमारे, प्रथमेश बनसोडे, वसंत गाडे, अजित गाडे, आनंद गाडे, जयंत गाडे, शीतल कोलप, मधुकर कोलप, हिरामण भगत, सागर आवळे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads