सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या 8 शाखांचे उद्घाटन राज उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष नाना कदम यांच्या हस्ते झाले. Inauguration of eight branches of Vanchit Bahujan Aghadi in Akkalkot taluka of Solapur district.
सोलापूर- अक्कलकोट तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव आणि जिल्हाध्यक्ष नाना कदम व तसेच जिल्हा महासचिव जावेद भाई पटेल आणि तालुक्याचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे या सर्वांच्या उपस्थितीत तालुक्यात आठ शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
राजस्व नगर,चांभार वस्ती, नागणसूर,चप्पळगाव, काझीकणबस,सांगवी,शिरवळ, भुरीकवठा आणि वागदरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी अनिल अण्णा जाधव यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर तथागत प्रतिष्ठान बुद्ध वस्ती या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ व स्वागत करण्यात आला. त्यानंतर वडार गल्ली मोरेवस्ती या ठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना अनिल अण्णा जाधव म्हणाले वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व जाती धर्मांना समावून घेणार असून जातीवादाला या ठिकाणी थारा नाही आपण सर्वांनी मिळून आज ज्याप्रकारे जोश दाखवलं आठ शाखेच्या कार्यकर्त्यांनी हा उस्ताह कायम ठेवत तळागाळातील वंचित समूहांना एकत्र करून त्यांना न्याय देण्याचा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावी आणि कसल्याही प्रकारची काम असू दे ती पूर्ण करण्यासाठी व वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर (Prakash ambedkar) यांचे विचार तळागाळात पोचण्यासाठी तुम्ही केव्हाही हाक द्या मी तयार आहे, असे मनोगत व्यक्त करण्यात आले .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नाना कदम, जिल्हा महासचिव जावेद पटेल, जिल्हा संघटक शिवाजी बनसोडे, कामगार संघटनेचे महासचिव सुरज राव ,अक्कलकोट तालुक्याचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा सचिव देवानंद ,तालुका सचिव खाजाप्पा हिवाळे आसवले जिल्हा उपाध्यक्ष मल्लिनाथ पाटील तालुका संघटक आनंद मोरे शहराध्यक्ष राहुल मोरे शहर महासचिव चनु शिंगे, युवा नेता प्रकाश शिंदे,अविनाश मोरे तालुका महासचिव नितीन शिवशरण तालुका महासचिव गौतम गायकवाड तालुका महासचिव नागेश हरवाळकर तालुका संघटक बबन गायकवाड तालुका संघटक श्याम बनसोडे तालुका संघटक राम हळे तालुका उपाध्यक्ष अमृत सोनकांबळे तालुका प्रसिद्धीप्रमुख संदीप गजधने तालुका उपाध्यक्ष नरसिंह गायकवाड जय नडगम शिव बसव डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मधीखांबे गंगाराम गायकवाड परशुराम भागळे, आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन चे तालुकाध्यक्ष रवी राज पोटे , तालुका कोषाध्यक्ष गणेश चिनवार आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा